Latest Marathi News

या अभिनेत्रीचा प्रेमाची कबुली देणारा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्रीचा इन्स्टाग्राम व्हिडिओ होतोय व्हायरल, हे आहे श्रद्धाचे पहिले प्रेम

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात श्रद्धा पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत पडद्यावर दिसणार आहे. पण श्रद्धाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.


बॉलिवूडचा ‘तू झुठी मै मक्कार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रद्धाबरोबर रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रथमच श्रद्धा आणि रणबीर ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लव रंजन दिग्दर्शित या सिनेमा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. तरुण पिढीचे प्रेमाबद्दलचे विचार आणि दृष्टिकोन यावर हा सिनेमा बेतलेला आहे. या सिनेमाचं ‘तेरे प्यार में’ हे फ्रेश गाणंसुद्धा नुकतंच प्रदर्शित झालंय. अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणं लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचं प्रमोशन करतानाच श्रद्धाने तिच्या प्रेमाबद्दल मोठा खुलासा केलाय. एक व्हिडिओ शेअर करत श्रद्धाने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओ शेअर करत तिने तिच्या चाहत्यांनासुद्धा त्यांच्या प्रेमाची कबुली देत या नव्या गाण्यावर रील शेअर करण्याचे आवाहन केले आहे. श्रद्धा या व्हिडिओमध्ये स्वतःसाठी पाणी पुरी बनवत असून पाणी पुरी खाताना आनंदी दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून श्रद्धा पाणीपुरीच्या प्रेमात आकंठ बुडाली असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

श्रद्धा कपूर जवळपास दोन वर्षांपासून सिनेमापासूनदूर राहिली आहे. मात्र अलिकडेच रणबीर कपूरसोबत तिचा एक आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या ८ मार्च रोजी श्रद्धा आणि रणबीर यांचा ‘तू झूठी मै मक्कार’ हा सिनेमा रिलीज होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!