Just another WordPress site

खासदार राहुल शेवाळेंनी लग्नाचे आश्वासन देऊन अत्याचार केला

पीडित तरूणीचा व्हिडिओ शेअर् करत दावा, शेवाळेंवरच पाकिस्तान कनेक्शनचा आरोप

मुंबई दि २८(प्रतिनिधी) – आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची जुनी प्रेयसी बरोबरचे संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी शेवाळेंनी पत्रकार परिषद घेत बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगशी संबंध असल्याचं सांगितलं. पण आता त्या महिलेने एक व्हिडिओ प्रसारित करत शेवाळेंवर गंभीर आरोप केले आहेत.

पीडित मुलीने सोशल मिडियावर व्हिडिओ टाकत शेवाळेंच्या आरोपाला उत्तर दिले आहे. ती म्हणाली मी दुबईची आहे. मी फॅशन डिझायनर आहे. मी अथक परिश्रम करुन करिअर केले आहे. मी दुबईची असल्याने अनेक देशात माझे मित्र आहेत. पाकिस्तान असो की बांगलादेश तेथील माझे मित्र आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी माझ्यावर तथ्यहिन आरोप केले आहेत,खासदार राहुल शेवाळे हे किती वेळा पाकिस्तान व कराचीला गेले आहेत. तेथे त्यांचे काय व्यवसाय आहेत. तेथे त्यांचे कोणते कोणते हाॅटेल्स् आहेत. कोणते कोणते रिअल ईस्टेट आहेत. त्यांच्याकडे पैसे कुठून येतात, याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करावी, अशी मागणी पीडित मुलीने केली आहे.राहुल शेवाळे यांनी मला मानसिक, शारीरीक त्रास दिला आहे. दारु पिऊन अत्याचार केला आहे. माझे दाऊदशी संबंध आहेत हे माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी दुबईतही राहुल शेवाळेविरोधात आवाज उठवला होता. मात्र तेथेही माझ्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली. आता मला न्याय हवा आहे अशी मागणी पीडित मुलीने केली आहे.

GIF Advt

आपल्या राजकीय ताकदीचा आणि संबंधांचा वापर करत राहुल शेवाळे हे मला सतत जीवे मारण्याची धमकी देत आहेत. आतापर्यंत दोन वेळा जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे.राहुल शेवाळेंचे दोन वर्षे माझ्यासोबत संबंध होते. मला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि आमचे संबंध तयार झाले होते, असा आरोप तरुणीने केला आहे. आता शेवाळे यावर काय बोलणार हे पहावे लागणार आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!