Latest Marathi News
Ganesh J GIF

‘या’ डॉक्टरसोबत नातेवाईकांनी केले असे काही…

संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद,पाहुन थरकाप उडेल...

बारामती दि ११ (प्रतिनिधी)- रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना बारामतीत घडली आहे. एक पेशंट तपासणीसाठी आला असता डॉक्टर घरात जेवण करत होते. त्यामुळे पेशंटला तपासण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला नाही.त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी डाॅक्टरला मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज गायकवाड हे डॉक्टर असून त्यांचा सांगवी येथे साई क्लिनिक या नावाने दवाखाना आहे, ते तिथेच राहतात. घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास गायकवाड हे घरामध्ये जेवण करीत होते. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा जोरजोरात वाजवून खिडकीची काच फोडण्यात आली. लवकर दरवाजा उघडला नाही म्हणून ही काच फोडली होती. जेवण झाल्यानंतर डॉक्टरांनी दरवाजा उघडला असता आनंद उर्फ अनिल जगताप, विश्वजीत जगताप, अशोक जगताप, भूषण जगताप यांनी गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यावेळी डाॅक्टरांच्या मुलालाही मारहाण करण्यात आली आहे.

डाॅक्टर गायकवाड यांनी याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!