
साऊथ अभिनेत्रीने चंदेरी लेहेंग्यामध्ये वाढवला इंटरनेटचा पारा
फोटो पाहून चाहते घायाळ, फोटोला कॅप्शनने वेधले नेटक-यांचे लक्ष
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाच्या जोरावर साऊथनंतर बाॅलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री रकुल प्रीत आपल्या छत्रीवाला या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण आता रकुलने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यत रकुलने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. रकुल तिच्या नव्या लूकने सध्या चागंलीच चर्चेत आहे. चंदेरी रंगाच्या लेहेंग्यात रकुलने तिचा नवा स्वॅग दाखवला आहे. बॉलिवूडची सुपरस्टार रकुल प्रीत सिंगने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामच्या अधिकृत हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. रकुल प्रीत सिंहच्या या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच किलर वाटत आहे. या फोटोमुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे. तिने आपले फोटो शेअर करत ‘हिऱ्यासारखे चमका’ अशी कॅप्शन दिली आहे. तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. रकूलचा ‘छत्रीवाली’ हा सिनेमा आला होता, या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली आहे. यात वेश्या व्यवसायावर भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
रकुलच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे झाले तर ४५ कोटींची मालकीन असलेली रकुल सध्या अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीना डेट करत आहे.रकुलने दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलीवुडमध्येही काम केले आहे. आगामी काळात मेरी पत्नी का रीमेक हे चित्रपट रीलीज होणार आहेत.