उद्धव ठाकरे नवीन पक्षासाठी तयार करत आहेत पक्षघटना
मशाल चिन्ह व शिवसेना नावाबाबत साशंकता, अशी असणार घटनेची रचना
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमीका घेतली. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. पण आता ठाकरे आपल्या पक्षाची राज्यघटना तयार करत आहेत. यासाठी कायदे तज्ञाची टिम तयार आहे.
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची राज्यघटना तयार केली जात आहे. त्याचबरोबर नवा पक्ष आणि चिन्ह मिळाल्यास त्यावर देखील चर्चा केली जात आहे. ठाकरेंनी याआधीच मशाल चिन्ह काढून घेतील असे म्हणत नव्या चिन्हाचे संकेत दिले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गडाकडून तयार करण्यात येणाऱ्या नव्या घटनेत शिवसेना पक्षातील जून्या गोष्टी जशाच्या तशा घेतल्या जाणार आहेत. नव्या पक्षामध्येही उद्धव ठाकरे हेच त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख असणार आहेत. तसेच पक्षाचे सर्व अधिकार हे उद्धव ठाकरे स्वत:कडेच ठेवणार आहेत. तसेत पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना पक्षाच्या काही नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे. एकंदरीत अगोदरचेच नियम राहणार आहे. पण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सर्वाधिकार उद्धव ठाकरे स्वतः कडे ठेवणार आहेत. पण कायदेशीर लढाईनंतर पक्षाचे नाव कोणते चिन्ह कोणते असणार यावर कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आणि समर्थक यांनी भाजपसोबत जात नवीन सरकार स्थापन केले आहे. राज्यात शिवसेनेतील दोन गटांमुळे खळबळजनक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आता या सर्व घडामोडीनंतर उद्धव ठाकरेंनी नवीन पक्षाच्या घटनेसाठी कायदेतज्ञांची एक स्वतंत्र टीम तयार केली आहे.