Latest Marathi News
Ganesh J GIF

अभ्यासाला लागा! दहावी बारावीचे अंतिम वेळापत्रक आले

'या' तारखेला होणार पहिला पेपर, प्रात्याक्षिक नंतर लगेच लेखी परिक्षा होणार

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा  २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालवधीत होणार आहे.

लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक याआधी सप्टेंबर महिन्यातच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानतंर वेळापत्रकाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी १५ दिवसांची मुदत दिली गेली होती. त्या सूचनांचा अभ्यास करुन अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ विभागीय मंडळाकडून दहावी, बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेआधी शाळा, महाविद्यालयात छापील स्वरुपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजर राहावं. व्हॉटसअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये. याशिवाय प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांच्या परीक्षेचं वेळापत्रक स्वतंत्रपणे संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना कळवण्यात येईल असे बोर्डाने स्पष्ट केले आहे

दहावी वेळापत्रक

मराठी : २ मार्च
इंग्रजी : ६ मार्च
हिंदी : ८ मार्च
बिजगणित : १३ मार्च
भूमिती : १५ मार्च
विज्ञान भाग १ : १७ मार्च
विज्ञान भाग २ : २० मार्च
इतिहास व राज्यशास्त्र : २३ मार्च
भूगोल : २५ मार्च

बारावीचे वेळापत्रक

इंग्रजी : २१ फेब्रुवारी
हिंदी : २२ फेब्रुवारी
मराठी : २३ फेब्रुवारी
भौतिकशास्त्र : २७ फेब्रुवारी
रसायनशास्त्र : १ मार्च
जीवशास्त्र : ८ मार्च
भूगोल : १७ मार्च

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!