ही अभिनेत्री म्हणते गाैतमीच्या कार्यक्रमावर बंदी घाला
गाैतमी पुन्हा वादात, हा शब्द वापरत म्हणाली लोकांनी..
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. आता एका अभिनेत्रीने गाैतमीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
माधुरी पवार एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे की, एका कलाकारानं दुसऱ्या कलाकारावर बोट दाखवू नये. पण सध्या जे काही सुरू आहे ते कलेचं विभत्स रूप दिसत आहे. मी माझ्या बाबांकडून नृत्याचे धडे घेतले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभारी होऊन अनेक गोष्टी शिकले, ट्राॅफीज मिळवल्या. परंतु हे सगळं मी एका दिवसात कमवलं नाही. खूप दिवस काम केल्यावर लोकांच्या मनात कलाकाराच्या कलेचा आदर येतो. फेमस होणं ही एक वेगळी गोष्ट आहे. परंतु सध्या गौतमी पाटीलकडून जे नृत्य सुरू आहे. ते पूर्ण चुकीचं आहे. त्यामुळं लवकरात लवकर तिच्या कार्यक्रमावर बंदी घालवी, अशी मागणी माधुरी पवारने केली आहे.
त्याचबरोबर कलाकाराने कधीही आपल्या कलेचा रिस्पेक्ट ठेवून आपली कला सादर करावी. लावणीचा दर्जा खूप मोठा आहे. मी त्याची धूळसुद्धा नाही. प्रेक्षकाच्या भावना समजून करमणूक केली पाहिजे. असेही माधुरी म्हणाली आहे.
पुण्यातील लोणी काळभोर येथील दहीहंडी दरम्यान गौतमीच्या पांढऱ्या साडीचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. तिने सादर केलेल्या नृत्यामध्ये अश्लील हावभाव असल्याने तिच्यावर मोठया प्रमाणात टीका होऊ लागली. आजवर अनेक ठिकाणी लावण्यांचे कार्यक्रम होतात मात्र गौतमीच्या नृत्याने खळबळ उडाली होती.