Latest Marathi News
Ganesh J GIF

…म्हणून दिराने केला वहिनीचा गळा दाबून खून

औरंगाबादेतील घटना, प्रेम आणि बदनामीची धमकी ठरले कारण

ओैरंगाबाद दि २२(प्रतिनिधी)- वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे घरामागे असलेल्या शौचालयाच्या टाकीमध्ये एका विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन पती आणि सासुला ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर पोलिसांच्या तपासात वेगळेच सत्य समोर आले. त्यानंतर पोलीसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी दिराला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार माया आगलावे असे मृत महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर आगलावे असे आरोपीचे नाव आहे. शिऊर येथील माया आगलावे यांच्या घरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीत त्यांच्या मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी मायाच्या आईने आपल्या जावयाने आणि त्याच्या आईनेच ही हत्या केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत, मायाच्या पतीला आणि सासूला ताब्यात घेतले होते. तसेच माया यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांना संशय असल्याने त्यांनी आपला तपास सुरु ठेवला होता. त्यावेळी पोलिसांना मृत माया आणि त्यांचा चुलत दीर ज्ञानेश्वर आगलावे यांच्यात अनैतिक प्रेम संबध होते आणि त्यातूनच हत्या झाली असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी तात्काळ ज्ञानेश्वरला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता मायाचा खून आपणच केला असल्याची कबुली देखील त्याने दिली आहे.

माया आगलावे आणि ज्ञानेश्वर नात्याने मायाचा चुलत दीर लागतो. त्यामुळे एकमेकांच्या घरात दोघांचे नेहमी येणेजाणे असायचे. त्यातून दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबंध निर्माण झाले आणि यातून महिला सतत पैशांची मागणी करायची तसेच पैसे दिले नाही तर बलात्काराचा आरोप करुन समाजात बदनाम करण्याची धमकी देखील मायाकडून मिळत होती या कारणाने तिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली आरोपी दिराने दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!