Just another WordPress site

सोलापूर सिटी हॉस्पिटलच्या वतीने विजयी ग्राप सदस्यांचा सन्मान

खुदावाडी(प्रतिनिधी) :- तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत जय हनुमान पॅनलच्या विजयी उमेदवारांचा सोलापूर येथील सिटी हॉस्पिटलच्या वतिने सन्मान करण्यात आला .

GIF Advt

ग्राम विकास आघाडी पॅनलचे सर्वसाधारण महिला गटातून सरपंचपदाच्या उमेदवार सरोजिनी रेवणसिद्ध कबाडे ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.तर जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे प्रभाग क्रमांक चार चे विजयी उमेदवार सावंत धनु पवार , कल्पना शंकर काटे हे ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहेत त्यांच्या या यशाबद्दल बिनविरोध सरपंच सरोजिनी कबाडे नूतन ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार कल्पना शंकर काटे यांचा सोलापूर सिटी हॉस्पिटल च्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला . यावेळी अमर नरवडे , सचिन पवार सह सिटी हॉस्पिटल चे डॉक्टर उपस्थित होते

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!