Latest Marathi News
Ganesh J GIF

विधानसभेत जोरदार राडा भाजपाचे आमदार निलंबित

विधानभवनातील राड्याचा व्हिडीओ व्हायरल, जेवणाला ब्रेक न दिल्याने आमदार संतापले

बेंगलोर दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपा सदस्यांनी जोरदार राडा घातला होता. यामुळे भाजपाच्या १२ सदस्यांचे निलंबन देखील करण्यात आले होते. आता कर्नाटकात देखील तसाच प्रकार घडला होता. पण आता महाराष्ट्रात विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने कर्नाटकातील तो व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.या अधिवेशनात भाजपाच्या सदस्यांनी जोरदार राडा घातल्याने त्यांचे निलंबीत केले आहे.

कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतरचे हे पहिले अधिवेशन होते. पण अधिवेधनात भाजपाने बंगळूरु येथील विरोधकांच्या बैठकीवेळी विविध नेत्यांच्या स्वागतासाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप करत हौदात धाव घेतली. पण या गोंधळात विधानसभा उपाध्यक्ष मात्र विधेयक पास करत होते. यामुळे संतापलेल्या भाजपा आमदारांनी गदारोळ सुरु केला. त्यात काही सदस्यांनी विधेयकाच्या प्रति फाडून उपाध्यक्षांवर भिरकावल्या. दलित असल्यानेच भाजप सदस्यांनी लक्ष्य केल्याचा आरोप लामनी यांनी केला. तसेच भाजप आणि जेडीएसनेही स्पीकरविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. त्याचवेळी गदारोळ सुरू असताना भाजप आमदार बसनगौडा पाटील यांचा रक्तदाब वाढला. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. विशेष म्हणजे या गोंधळामुळे भाजपच्या १० आमदारांना उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. उपसभापती रुद्रप्पा लमाणी यांनी निलंबित केलेल्या भाजपच्या १० आमदारांमध्ये डॉ. सीएन अश्वथ नारायण, व्ही सुनील कुमार, आर अशोक, अराग ज्ञानेंद्र, डी वेदव्यास कामथ, यशपाल सुवर्णा, धीरज मुनिराज, ए उमानाथ कोटियन, अरविंद बेलाड आणि वाय भरत शेट्टी यांचा समावेश आहे. विरोधकांच्या बैठकीसाठी काँग्रेस सरकारने आयएएस अधिकारी तैनात केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. हा सरकारी यंत्रणेचा गैरवापर असल्याचा आरोप करण्यात आला होता. या गदारोळात विधानसभा अध्यक्षांनी पाच विधेयके संमत केली होती.

कर्नाटक विधानसभेचे विधानसभेचे अधिवेशन ३ जुलैपासून सुरू झाले असून ते २१ जुलै या कालावधीत पार पडले. पण यावेळी विरोधकांच्या निषेधार्थ कामकाज सुरू ठेवण्याच्या आणि जेवणाला ब्रेक न देण्याच्या सभापतींच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या भाजप आमदारांनी अचानकपणे सभापती आणि उपसभापतींवर कागद फेकण्यास सुरुवात केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!