Latest Marathi News
Ganesh J GIF

एकीकडे मुख्यमंत्र्यांकडून काैतुक तर दुसरीकडे संभाजी बिग्रेडची घोषणाबाजी

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधानामुळे श्री श्री रविशंकर महाराजांचा विरोध

तुळजापूर दि ३(प्रतिनिधी) – आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे काैतुक केले असताना दुसरीकडे संभाजी बिग्रेडने मात्र त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

जालन्यात आर्ट आॅफ लिव्हींगच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी महाराजांचे काैतुक केले. ते म्हणाले की, “आम्ही जेव्हा गुवाहाटीला होतो तेव्हा गुरुजींनी मला आशीर्वाद दिले. मल त्यांनी कॉल केला. श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणाले, अच्छा काम कर रहे हो, असं सांगतानाच बाकी मी काही बोलत नाही. सर्व तुम्हाला माहीत आहे, असं सूचक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले होते. पण दुसरीकडे मात्र तुळजापूरातील कार्यक्रमात त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या जुन्या विधानावरून संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे कार्यक्रमाला कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही काही कार्यकर्त्यांनी श्री श्री रविशंकर यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पण त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

 

पण कार्यक्रमाच्या शेवटी श्री श्री रविशंकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्याकर्त्यांच्या कामाची स्तुती करत इतिहासकारांच्या वेगवेगळ्या लिखाणाने काही चुका झाल्या. त्याकडे दुर्लक्ष करून मिळून काम करू असा प्रेमाचा सल्ला दिला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!