Latest Marathi News

भारताच्या या क्रिकेटपटूच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी

पैसे मागितल्याने जीवे मारण्याची धमकी, बघा फसवणूकीचा नेमका प्रकार काय?

मुंबई दि ३(प्रतिनिधी) – भारतीय क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज दीपक चहरच्या पत्नी जया भारद्वाजला १० लाख रुपयांना फसवण्यात आले आहे. दीपक चहरची पत्नी जयाची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील एका माजी अधिकाऱ्याने ही फसवणूक केली आहे. दीपक चहरच्या वडिलांनी संबंधित माजी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.


हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये माजी अधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी दीपक चहरची पत्नी जयासोबत करार केला होता. त्यावेळी दहा लाख रुपये घेतले होते. पण ते पैसे मागितल्यानंतर शिविगाळ करण्यात आल्याने तक्रार नोंदवण्यात आली आहे. दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबादच्या पारिख स्पोर्ट्समध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारीख स्पोर्ट्सने जया भारद्वाज यांच्याकडून करारासाठी १० लाख रुपये घेतले होते, जे त्याने परत केले नाहीत. या फर्मचे मालक ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


दीपक चहर हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो. दुखापतीमुळे तो अनेक महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे.भारताचा क्रिकेटपटू चहर याने जून २०२२ मध्ये गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिच्याशी लग्न केले. मागच्याच वर्षी त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स कडून खेळत असताना सामना जिंकल्यानंतर जयाला लग्नासाठी प्रपोज केले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!