Latest Marathi News
Ganesh J GIF

साहित्य संमेलनात मुख्यमंत्री शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजी

साहित्य संमेलनाला वादाचे गालबोट, विरोधातील घोषणाबाजी व्हिडिओ व्हायरल

वर्धा दि ३(प्रतिनिधी)- वर्धात आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली पण संमेलन आणि वाद यांचे नाते पुन्हा पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कारण संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कागद झळकावले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री भाषण करण्यासाठी उभे राहिले असता काहींनी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. ठाकरे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी खोक्यांचा मुद्दा उपस्थित करत ५० खोके एकदम ओक्के, गद्दार अशा घोषणाबाजी करत विरोध दर्शवला. तर, काही विदर्भवादी महिलांनी विदर्भाचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या निषेध नोंदवला. यामुळे संमेलन ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. महत्वाचे म्हणजे सुरक्षाकडे भेदून हे आंदोलक कसे आत आले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरामुळे संमेलनाच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचा व्हिडिओही समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. तर संमेलन वादात रंगले आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, “हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहेत. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे तुमच्यासाठी २४ तास उघडी आहेत. असे म्हणत आंदोलकांना शांतता पाळण्याच आवाहन केले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!