नगरमधील बारावीच्या विद्यार्थिनीचा विषबाधेने मृत्यू
बारावीचे पेपर सुरु असतानाच मृत्यूने गाठले, ही एक चूक बेतली जीवावर
अहमदनगर दि ७ (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातीस लोणी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. बारावीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले. त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली, पण उपचार सुरू असताना विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे.
तेजस्विनी मनोज दिघे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तेजस्वनी बाभळेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिची सध्या बारावीची परीक्षा सुरू होती. प्रवरानगर येथील केंद्रावर ती पेपर देत होते. बुधवारी तिने रसायनशास्त्राचा पेपर देऊन आल्यानंतर तेजस्वीनी आणि तिच्या आजोबाने रात्रीच्या वेळी सकाळची इडली सांबर खाल्ले. काही वेळातच दोघांनाही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण परिस्थिती गंभीर असल्याने पुण्यातील केईएम रूग्णालयात हलवण्यात आले. अखेर सोमवारी तिचा रुग्णालयातच मृत्यू झाला. तेजस्विनी विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. पण तिच्या मृत्यूने हे स्वप्न भंगले आहे.
राज्यात सध्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षेची पूर्ण तयारी करुन विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी जात आहेत. पण आहाराकडेही लक्ष देण्याची गरज आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने तिचे आजोबा यातून बचावले आहेत.