Just another WordPress site

‘तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते’

संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा, या मुद्यावर शिवसेना आक्रमक

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि मनसेकडून राहुल गांधींवर टीका केली जात असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त करत काँग्रेसला इशारा दिला आहे. गांधीनी सावरकरांविरोधात टिका केली तर महाविकास आघाडीत फूटही पडू शकते, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

 

GIF Advt

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर टिका केली. ते म्हणाले की, ‘वीर सावरकरांविषयी कोणत्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य किंवा त्यांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलं आहे. हे सांगितल्यानंतर आमचा विषय संपला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात तर अधिक प्रतिसाद मिळाला. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून ही यात्रा सुरू आहे. मात्र या यात्रेत सावरकरांचा मुद्दा काढण्याची काहीच गरज नव्हती. इतिहासात काय घडलं, याकडे लक्ष देण्यापेक्षा राहुल गांधी यांनी नवा इतिहास निर्माण करण्याकडे लक्ष द्यावं. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतही फूट पडू शकते,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने पहिल्यांदाच महाविकास आघाडीबाबत मोठे वक्तव्य केल्यामुळे काँग्रेस बॅकफुटवर गेली आहे. तर काँग्रेसच्याही अनेक नेत्यांची अडचण झाली आहे.

 

संजय राऊत यांनी भाजपवरही निशाना साधला आहे.वीर सावकरांना भारतरत्न द्यावा, अशी आमची मागणी आहे. भाजप आणि इतर पक्षात जे नवे सावरकर भक्त तयार झाले आहेत, ते लोक आमची ही मागणी का उचलून धरत नाहीत, वीर सावरकर हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते. मात्र आता राजकारणासाठी त्यांनी हा मुद्दा हाती घेतला आहे. असे म्हणत राऊतांनी भाजपाला टोला लगावला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!