Latest Marathi News

अभ्यास करताना अचानक पूजा सोबत घडले अघटित…

पुजासोबत घडलेली घटना अभ्यासिकेतील सीसीटीव्हीत कैद

पुणे दि ३०(प्रतिनिधी) – पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडगाव शेरीत श्री स्टडी सेंटर या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एका युवतीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. पूजा वसंत राठोड असे त्या मुलीचे नाव आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला आहे.

पूजा ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील कोंडी तांडा या गावातील आहे. पूजाचे बीएससी पर्यंतचे शिक्षण हे संगमेश्वर काॅलेजला झाले तर पदव्युत्तर शिक्षण पुण्यात झाले. पूजा पुण्यात टाटा कन्सल्टिंग सर्विसेसमध्ये नोकरी करत होती. नोकरी करत असतानाच पूजा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. पूजा पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील श्री. स्टडी सेंटर या अभ्यासिकेत अभ्यास करत होती. अचानक तिला हृदयविकाराचा झटका आल्याने ती जागेवरच कोसळली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पूजाला मृत घोषित केले.हृदयविकाराचा झटका आल्याची घटना अभ्यासिकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पूजा राठोड हिचे मुळगाव असलेल्या कोंडी तांडा येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय हुशार आणि होतकरु असलेल्या पूजाच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने स्पर्धा परिक्षा देणाऱ्या मुलांमधील ताण तणावांचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!