Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसरमधील त्या भीषण अपघाताचे सीसीटीव्हीचे फुटेज समोर

अपघातानंतर तरी पुणे सोलापूर महामार्गावरील बेशिस्त वाहतूक सु्धारणार का?

पुणे दि ३०(प्रतिनिधी) – राज्यातील अपघात सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. हडपसरमध्येही झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर तीन चार रिक्षांचा चक्काचूर झाला होता. या भीषण अपघाताचे सीसीटीव्हीत फुटेज समोर आले आहे.

सिमेंटचा मिक्सरचा ट्रक सोलापूर रोडने पुण्याच्या दिशेने घेऊन येत होता. तो गाडीतळ येथे आल्यानंतर त्याने समोरील प्रथम एका रिक्षाला जोराची धडक दिली. यानतंर त्याने दुचाकीला आणि त्यानंतर पुन्हा तीन रिक्षा व एका वाहनाला उडविले. त्यानंतर हा कंटनेर झाडाला जाऊन आदळला. हा अपघात इतका भयंकर होता की, रिक्षाचालक रणजीत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानिमित्ताने पुण्यातील रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्यावरच थांबत असतात. त्यामुळे उरलेल्या मार्गावरून रहदारी सुरु असते यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत असतात. आता तरी पोलीस याकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान अपघातामध्ये रिक्षाचालक रणजित जाधव याचा मृत्यू झाला आहे. त्याची माहिती घेऊन संघटनेच्या माध्यमातून त्यांना मदत करू, कारण रिक्षाचालक पब्लिक सर्व्हंट असतात असे रिक्षा पंचायत संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढव यांनी सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!