अजित पवार म्हणतात ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’
महाराष्ट्राच्या राजकारणात ही नवी दोस्ती बदल घडवणार का? बघाच
पुणे दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरुन ठाकरे शिंदे गटात संघर्ष दिसून येत आहे. आमचाच दसरा मेळावा खरा हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीकडून केला जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषणही एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना तुम्ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाचे भाषण पहिले ऐकाल?, असा प्रश्न विचारण्यात आला. तेंव्हा अजित पवारांनी दोस्तीचा दाखला दिला आहे.
दसरा मेळाव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि शिंदे या दोघांची भाषणे एकाचवेळी सुरु झाली तर मी प्रथम उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकेन. त्यानंतर टीव्हीवर रिपीट करण्यात येणारे एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकेन, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेशी असलेला ऋणानुबंध शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न करेल”अशी पुस्तीही पवारांनी जोडली आहे. पण यावेळी राज्यभरातून कार्यकर्ते येत असतात.नियमांचे पालन करुन आपापला दसरा मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे असे सांगत कायदा सुव्यस्वस्था राखली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे.यावेळी अजित पवारांनी भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसे मत नाही.अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
दसर-याच्या दिवशी एकीकडे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचे भाषण होणार आहे. यात उद्धव ठाकरेंचे भाषण पहिल्यांदा ऎकणार असे म्हणत राष्ट्रवादी आगामी काळात शिवसेनेच्या साथीनेच निवडणुकांसामोरे जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडी ये दोस्ती हम नही छोडेंगे असाच निर्धार केल्याचे दिसत आहे.