Latest Marathi News
Ganesh J GIF

पतीच्या अनैतिक संबंधामुळे विवाहित महिलेची आत्महत्या

व्हिडिओ आणि सुसाईट नोटमध्ये महिलेने केले गंभीर आरोप, पण चिमुरडी आईच्या प्रेमाला मुकली

अहमदाबाद दि २५(प्रतिनिधी)- महिला आत्महत्येच्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आता राजकोटमध्ये एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी ओैषध प्राशन करुन तिने आत्महत्या केली. व्हिडिओ आणि सुसाईड नोट लिहित या महिलेने आत्महत्या केली आहे.

अलका परमार असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ती राजकोटच्या लक्ष्मी नगर भागात राहत होती. महिलेने तिच्या पतीचे पायल नावाच्या महिलेसोबत संबंध असल्याचे सांगत आत्महत्या केली आहे. सलमा यांनी सुसाईड नोटमध्ये “पतीचे पायल नावाच्या महिलेसोबत संबंध होते. माझं कोणी काही ऐकत नाही. मी जगून काय करु, पायल तुमची आहे, माझ्या लेकीला सांभाळा” असे लिहित आत्महत्या केली आहे. तसेच तिने बनवलेल्या व्हिडीओमध्ये पती आणि सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान अलका परमारचा यांचा विवाह ११ वर्षांपूर्वी जैस्मिन परमारसोबत झाला होता. लग्नाच्या दोन वर्षांनी अलकाला मुलगी झाली. ती आता ९ वर्षाची आहे. पण आता अलका यांनी आत्महत्या केल्याने ती आईच्या प्रेमाला कायमची मुकली आहे.

राजकोटच्या मालवीय नगर पोलीस ठाण्यात भावाच्या तक्रारीवरून पती जैस्मिन परमार, सासरे रमेशभाई परमार, सासू सरोजबेन परमार आणि पतीची मैत्रीण पायल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!