Latest Marathi News
Ganesh J GIF

नांदेडमध्ये विवाहित प्रेयसी आणि प्रियकराची आत्महत्या

तीन वर्षाच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट, पुण्याहून आल्यानंतर...

नांदेड दि ६(प्रतिनिधी)- नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अंजली थोरात आणि आकाश वाठोरै अशी मृत तरुण आणि तरुणीचे नाव आहेत. दाेघांच्या या कृत्याने प्रेमीयुगलाच्या कुटुंबास मात्र माेठा धक्का बसला आहे.

ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील दर्याबाई उमरी गावात घडली. मयत अंजली थोरात आणि आकाश वाठोरै यांचे प्रेमप्रकरण होते. अंजली ही मूळची अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावाची रहिवाशी होती. अंजलीच्या आईचा मृत्यू झाला आहे त्यामुळे ती आजोळी मामाकडेच राहत होती. याच गावातील आकाश सोबत तिची मैत्री झाली होती. पुढे चालून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही शिक्षणासाठी हदगावला ये-जा करत होते. ही गाेष्ट दाेघांच्या कुटुंबियांना समजली. दाेन्ही कुटुंबातून या प्रेम प्रकरणास विरोध झाला. काही दिवसानंतर अंजलीचा विवाह झाला. लग्नानंतर अंजली आणि तिचा पती पुणे येथे राहत होते. परंतु अंजलीचा आकाश बराेबर संवाद सुरु राहिला. अंजली २८ मार्च रोजी नांदेडला आली होती. तेव्हा तिला आकाशने गाडीवर गावी आणले. पण ही माहिती आजोबाला समजली आणि त्यांनी दोघांवर राग काढला. त्यामुळे दोघांनी ३० मार्चला विषप्राशन केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

अंजली आणि आकाशच्या या कृत्याने कुटुंबियांना माेठा धक्का बसला आहे. शवविच्छेदन अहवला उशिरा प्राप्त झाल्याने आज मनाठा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!