Latest Marathi News
Ganesh J GIF

दत्ताची कविता म्हणत सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टिका

वाढती महागाई रोखून जनतेला दिलासा देण्याची केली मागणी

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- देशातल्या वाढत्या महागाईवर लोकसभेत आज झालेल्या चर्चेत सुप्रिया सुळे यांनी मराठी कविता म्हणत सरकारच्या जीएसटी धोरणावर टिका केली.त्याचबरोबर दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांची आठवण करुन देत महागाईवर सरकारला टोला लगावला.

 

संसदेत महागाईवर बोलताना सुळे म्हणाल्या की, “महागाईवर आज चर्चा करत असताना केंद्रिय मंत्री वारंवार मागील साठ वर्षांचा दाखल देत आहेत. पण आता आपणही सत्तेत येऊन आठ वर्षे झाली आहेत. लक्षात घ्या, आठ वर्षे हा मोठा काळ असतो. त्यामुळे मागील धोरणांवर टिका करण्याऐवजी महागाई कमी करण्यासाठी पावले उचलायला हवीत. कृती दुबे या एका सहा वर्षाच्या मुलीने पंतप्रधानांना महाग झालेल्या पेन्सिलबाबत पत्र लिहिले आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देणाऱ्या सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लहानपणी आम्हाला एक कविता होती, ‘दत्त दत्त, दत्ताची गाय, गाईचे दूध, दूधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप’ अशा त्यातील काही ओळी होत्या. या कवितेतील आज दत्त आणि गाय सोडले तर सर्व गोष्टींवर सरकारने जीएसटी लावली आहे.स्वयंपाकाच्या सिलिंडरबाबत हे सरकार सांगते की दर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या वेळेचेच आहेत. पण त्यावेळी सरकार गॅसवर सबसिडी देत होते. पण आता ती देखील बंद झाली. त्यामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. पंतप्रधान ‘ग्रीन कंट्री’चा नारा देत सोलर एनर्जीला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे सोलर वस्तूंवर १८ टक्के जीसटी लावली जाते. यावरून सरकारच्या धोरणांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. सुषमाजी म्हणायच्या, ‘आकडों से पेट नहीं भरता, भूख लगती है, तो धान लगता है’, त्यामुखे महागाई कमी करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा.अशी मागणी त्यांनी केली.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी केंद्र सरकारवर जीएसटी, नोटबंदी, बँकिंग धोरण, सोलर एनर्जी, निर्यात धोरण यावर जोरदार टिका करताना, सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु असे आश्वासन दिले होते. त्यावर श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!