Just another WordPress site

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हाव्यात

खासदार अमोल कोल्हे यांची इच्छा, राष्ट्रवादीत अस्वस्थता

मुंबई दि १ (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हायला हव्यात अशी इच्छा शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्र्यांनी कारकीर्द गावजली आहे.त्यामुळे हिरक महोत्सवी महाराष्ट्रात जर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यातर आपल्याला पाहायला आवडेल, अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

 

GIF Advt

झी-मराठी वाहिनीच्या ‘बस बाई बस’च्या सेटवर कार्यक्रमाच्या पहिल्या भागासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांची चित्रफीत दाखवण्यात आली.त्यावेळी ते म्हणाले की,”मी खासदार झालो तेव्हा मोठ्या बहिनीप्रमाणे सुप्रिया ताईंनी मला जबाबदारीची जाणीव करुन दिली. देशातील १२० कोटी लोकांमधून केवळ ५४३ लोकांना संसदेत बसण्याची संधी मिळते. त्यापैकी तुम्ही एक आहात. लोकांसाठी काम करा, असा सल्लाही सुप्रियाताई देतात. देशातील उत्तरप्रदेश, बिहार, तमिळनाडू, गुजरातला महिला मुख्यमंत्री लाभलेल्या आहेत. मात्र, हिरकमहोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणातील भावी मुख्यमंत्री म्हणून मी सुप्रिया सुळेंकडे पाहतो.असे कोल्हे म्हणाले आहेत.

 

सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणा रस नाही, असे वारंवार सांगितले आहे.परंतु त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी कायम चर्चेत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीतील एक गट सक्रीय असतो. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे दोन गट पहायला मिळतात. आता कोल्हे यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा पक्षात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!