
बहुप्रतिक्षित मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’चं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. आजपासून मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत आला आहे.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे. मात्र आज उद्घाटनच्या दिवशी एक्सप्रेसवर मोठी वाहतूककोंडी झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एवढच नाही तर खासदार सु्प्रिया सुळेंना देखील याचा फटका बसला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या सर्व प्रवाशांची माफी मागितली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला असून बारामतीतील कार्यक्रमाला त्या वेळेत पोहचल्या नाहीत. सुप्रिया सुळे यांनी या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये त्या स्वतः वाहतूक कोंडीत अडकल्या असल्याचे सांगताना दिसत आहेत. तसेच, शेजारील वाहनचालकांशी संवाद साधत दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलो आहोत,” असे त्या म्हणताना दिसतात. काही वाहनचालकांनीही सकाळी सात वाजता निघूनही अजून मार्ग मोकळा न झाल्याची व्यथा व्यक्त केली.देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?दरम्यान आज मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला माफी मागायची आहे. आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक जाममध्ये अनेक जण अडकले, त्यांना त्रास सहन करावा लागला. सुप्रिया सुळे यांचा देखील व्हिडिओ आला. सुप्रियाताई आज तुम्ही शेवटचं ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. आत्ता तुम्ही कधीच पुण्याला जाताना ट्राफिक मध्ये अडकणार नाही. तुमच्या सरकार ने जे काम थांबवला होत ते काम आमच्या सरकार ने पूर्ण केलं आहे

मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे आज उद्धाटन
आजपासून मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये खर्च करून 13.5 कि.मी. लांबीचा मिसिंग लिंक बांधलाय. खोपोली एक्झिटजवळील पूल क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्गाचे लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. हा प्रकल्प केवळ एक पूल नसून आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. याचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे यातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आला आहे. दरम्यान मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


