
पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! ‘मिसिंग लिंक’च्या लोकार्पणाने वाहतूक कोंडीतून मोठी सुटका; वेळेचीही होणार बचत
आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र भाषिक राज्य अस्तित्वात आलं. हा केवळ भाषेचा लढा नव्हता. तर स्वाभिमान आणि अभिमानाचा लढा होता. मराठी राज्य अस्तित्वात आलं.

चांद्यापासून बांद्यापर्यंत देशाला घडवणारं राष्ट्र अस्तित्वात आलं. दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र अशी डौलदार आणि शानदार बिरुदावली महाराष्ट्राला मिळाली. आजही देशाच्या विकासात, प्रगतीत महाराष्ट्र सर्वात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम वेळोवेळी केलं आहे. आज सकाळीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील प्रशासकीय इमारती काल रात्रीपासून रोषणाईने उजळून निघाल्या.

तर काल विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध होण्याचा मार्ग काँग्रेसमुळे मोकळा झाला. काँग्रेसने महाविकास आघाडीत दुसरा उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे निवडणूक टळली. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत सातव या उभ्या आहेत. राज ठाकरे हे मराठी हृदयसम्राट असे बॅनर पुण्यात झळकले आहेत. मराठी बोलणार नाही अशी हिंमत येते कुठून असा सवाल ठाकरे यांनी काल सभेत विचारला.


