Latest Marathi News
Ganesh J GIF

चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची मारहाण करत हत्या

हत्येआधी हात मोडला, दात पाडले, भावाला मेसेज पाठवत पतीनेही उचलले टोकाचे पाऊल, उडाली खळबळ

धुळे दि ८(प्रतिनिधी)- धुळे तालुक्यातील कुंडाणे, वेल्हाणे येथे पतीने पत्नीचा खून करत नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात पतीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे.

पती जितेंद्र बालू सोनवणे याने आत्महत्या केली आहे. पण त्याआधी त्याने आपली पत्नी प्रतीक्षा जितेंद्र सोनवणे हिचा खून केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी जितेंद्रने मुंबईतील आपला भाऊ गणेश यास मुलांचा सांभाळ कर, असा मेसेज पाठविला. तो गणेशने पहाटे पाचनंतर पाहिला, त्याने लगेच जितेंद्रला फोन केला. त्यावेळी जितेंद्रच्या मुलीने घडलेली घटना सांगितली. तसेच घटनेच्या दिवशी जितेंद्रचे आई वडील बदलापूर येथे मोठ्या मुलाकडे गेले होते. जितेंद्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. त्याचबरोबर जितेंद्र घरगुती कारणामुळे तणावात होता. त्यातून त्याने हत्या केली. जितेंद्र सोनवणेचे घर सकाळी साडेसहा ते सातपर्यंत बंद असल्यामुळे शेजारच्यांनी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलीस पाटलांना याची माहिती दिली. त्यांच्यासह ग्रामस्थांनी दरवाजा तोडून घरात पाहिले असता सोनवणे दांपत्य गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. दरम्यान मृत जितेंद्रने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी, काही व्हिडिओ क्लिप, मेसेज संशयास्पद असून, त्याची चौकशी करून या दांपत्याच्या आत्महत्या किंवा टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केलेल्या संशयितांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. पण या घटनेमुळे तीन वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी पोरकी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विजया पवार, हवालदार सुनील जोहरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनवणे दांपत्याचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कैलास श्यामराव पाटील यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!