Latest Marathi News
Ganesh J GIF

‘तू मला या जगात एकटे सोडून गेलास, मी पण येत आहे’

प्रियकराच्या आत्महत्येने खचलेल्या नवविवाहितेची आत्महत्या, स्टेटस ठेवत संपवले जीवन

जयपूर दि ८(प्रतिनिधी)- राजस्थानच्या बाडमेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेने लग्नाच्या दोनच दिवसात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिता असे नवविवाहितेचे नाव आहे. महत्वाचे म्हणजे तिच्या प्रियकराने तीन दिवसापूर्वी आत्महत्या केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार अनिता हिचा विवाह ४ जुलैला रोजी झाला होता. पण तिचे पुरखाराम सोबत प्रेमसंबंध होते. पण घरच्यांनी तिच्या इच्छेविरोधात लग्न लावून दिले. अनिताच्या लग्नाने निराश झालेल्या पुरखारामने तिच्या लग्नादिवशीच विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर दोन दिवसांनी ज्यावेळेस नवविवाहिता अनिता तिच्या घरी परतली. त्यावेळी तिला प्रियकर पुरखारामचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. या घटनेने नवविवाहित अनिताला मोठा धक्का बसला. पण अनिताने सर्व ठिक असल्याचे दाखवले. पण घटनेच्या दिवशी अनिताने गोठ्यात दूध आणायला जाते असे घरच्यांना सांगून बाहेर पडली. अनेक तास उलटून देखील ती घरी परतली नसल्याने कुटुंबियांनी तिची शोधाशोध सूरू केली होती. यावेळी नवविवाहितेच्या पायांचे ठसे पाहून कुटुंबीय विहरीपर्यंत पोहोचले. दुधाचे भांडण विहिरीच्या जवळच होते, तर नवविवाहितेचा मृतदेह विहिरीत तरंगत होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवला. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी अनिताने एक सोशल मीडिया पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये अनिताने तिच्या प्रियकराचा फोटो लावून लिहले आहे की, ”आपण जीवन मरणाची शपथ घेतली होती.मग तू एकट्याने असे पाऊल का उचललेस, तू माझ्यासोबत असे का केले? खूप आश्वासने दिली होतीस, तूच मला या जगात रस्त्याच्या मधोमध एकटे सोडलेस. तू माझी फसवणूक का केलीस आपण एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली, मग एकट्याने हे पाऊल का उचलले? काही हरकत नाही जान, आता मी तुझ्याकडे येत आहे, मला दोन दिवस उशीर झाला आहे, माफ कर जान. अशा भावना तिने व्यक्त करत आत्महत्या केली.

प्राथमिक माहितीनूसार प्रेम करणातून ही घटना घडल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पण पुरखाराम याने आत्महत्या केली, की अपघाताने त्याचा मृत्यू झाला याबाबत स्पष्टता येऊ शकली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!