Latest Marathi News
Ganesh J GIF

ठरल तर! स्वाभिमानी शेतकरी संघटना या मतदासंघातुन लढवणार लोकसभा निवडणूक

उमेदवारही ठरले, राजू शेट्टींनी फुंकले लोकसभेचे बिगुल, पहा जागा आणि उमेदवार, लढत रंगणार

कोल्हापूर दि २४(प्रतिनिधी)- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी लोकसभेच्या मैदानात राज्यातील सहा जागा लढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी हातकलंगले शिवाय इतर मतदारसंघाची घोषणा केली नव्हती. त्यानंतर आता स्वाभिमानीने सहा मतदारसंघाची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभेचे पहिले रणशिंग फुंकले गेले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने युती, आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडत लोकसभेच्या २०२४ च्या निवडणूका स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. गेल्यावेळी महाविकास आघाडी बरोबर आघाडी करताना हातकणंगले आणि सांगली हे दोन मतदारसंघ स्वाभिमानीने लढवले होते. आता मात्र सहा जागा लढण्याची घोषणा करतानाच मतदार संघ ही जाहीर केले आहेत. स्वाभिमानी यावेळी हातकणंगले, सांगली, माढा, कोल्हापूर, बुलढाणा, परभणी असे हे मतदारसंघ आहेत. यामध्ये हातकणंगलेतून शेट्टी स्वतः लढणार असून बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर यांची उमेदवारी निश्चित आहे. इतर चार मतदारसंघात स्वच्छ आणि ताकतीच्या उमेदवारांचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी इतर पक्षांबरोबर आघाडीसाठी प्रयत्न करणार आहे. पण शेकाप, रासप, यासोबतचे बोलणे अंतिम टप्प्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणूकीचे बिगुल फुंकल्याने राज्यातील राजकीय धुरळा उडणार आहे. स्वाभिमानीने तयारी सुरू केल्याने इतर पक्षही लवकरच तयारी सुरु करणार आहेत.

हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी दोन वेळा निवडून आले आहेत. तर त्याचवेळी रविकांत तुपकर यांचेही मोठे संघटन असल्यामुळे या दोन मतदासंघात स्वाभिमानी प्रस्थापितांना जोरदार धक्का देऊ शकते. दुसरीकडे भाजपा शिवसेना आणि महाविकास आघाडीची जागावाटपावर खलबते सुरु आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!