वैभव नाईक शिंदेच्या शिवसेनेत यायला तयार होते पण..
निष्ठेची भाषा म्हणत भाजपा नेत्याने सांगितले आतले कारण, प्रवेशासाठी हवा राणेंचा होकार?
सिंधुदूर्ग दि २४(प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईक हे एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेत प्रवेश करतील, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. वैभव नाईक यांच्याकडून सिंधुदुर्गचे शिवसेना जिल्हाप्रमुखपद काढून घेतल्यानंतर या चर्चांनी आणखी जोर धरला आहे. पण नाईक यांनी मात्र याचा इन्कार केला आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. मागील काही काळामध्ये आमदार वैभव नाईक शिंदेंच्या शिवसेनेत यायला तयार होते. परंतु, एका अटीमुळे प्रवेश लांबणीवर पडला, असे निलेश राणेंनी म्हंटले आहे. नाईक शिवसेनेत यायला तयार होते. परंतु, राणे जर कुडाळ मालवण मधून लढणार नसतील आणि मलाच कुडाळ मालवणमधून तिकीट मिळणार असेल. तर मी शिवसेनेत यायला तयार आहे, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली होती. हे खरं नसेल तर मी कोणत्याही मंदिरात यायला तयार आहे. वैभव नाईक यांनी देवावर हात ठेवून सांगावे ही चर्चा झाली की नाही, असे आव्हान निलेश राणे यांनी दिले आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत हा खळबळ जनक दावा केला आहे. तर वैभव नाईक यांच्या निष्ठेचा दाखला त्यांच्या घरचेही देऊ शकत नाही असं खळबळ जनक विधान निलेश राणे यांनी केले आहे. मालवण-कुडाळ मतदारसंघावर राणे कुटुंबाचा दावा आहे, त्यामुळे राणेंच्या भूमिकेवरच वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश अवलंबून असल्याचंही निलेश राणेंनी सांगितलं आहे. दरम्यान वैभव नाईक यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही कोकणातले खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या पोस्टर्समधून वैभव नाईकांचे फोटो गायब होते.
नाईम मी उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं सांगतात मात्र स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी व मी आमदार राहिलो पाहिजे या गणितामध्ये त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरेंचं देणंघेणं नाही असावी दावा राणे यांनी केला आहे. कोकणात माजी खासदार निलेश राणे व आमदार वैभव नाईक यांच्यातील राजकीय वाद काही नवा नाही. दोन्ही बाजुंनी टीकेची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे आता नाईक काय प्रतिक्रिया देतात ते पहावे लागेल.