चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टिम इंडियाची घोषणा
ह्या खेळाडूकडे उपकर्णधारपद, स्टार गोलंदाजाचे संघात पुनरागमन, पहा टीम इंडियाचा संघ
मुंबई – टीम इंडियाची चॅम्पियन ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी घोषणा झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भारताचा संघ जाहीर केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
भारताच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे तर उपकर्णधारपदाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहचा समावेश केला जाणार की नाही? याबाबत सातत्याने चर्चा पाहायला मिळत होती. बुमराहला ऑस्ट्रेलियात दौऱ्यातील सिडनी कसोटीत पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे बुमराहलाच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह होते, अखेर निवड समिताने बुमराहचा संघात समावेश केला आहे. २०२३ च्या वल्डकपपासून संघाबाहेर असलेला गोलंदाज मोहम्मद शमीची संघात निवड केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.