या देसी अभिनेत्रीच्या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित
गाण्यातील लुकने वेधले लक्ष, एन्ट्रीची झलक पाहून चाहते घायाळ
मुंबई दि ४(प्रतिनिधी) – बाॅलीवूडमध्ये मुख्य भूमिकेत आगमन करण्यास सज्ज असलेली अभिनेत्री शहनाज गिल लवकरच रॅपर आणि सोशल मीडिया सेन्सेशन एमसी स्क्वेअरच्या आगामी ‘गनी स्यानी’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. याचा टिझर रिलीज असून यात शहनाज हाॅट अंदाजात दिसत आहे.
शहनाज गिलला पंजाबची कॅटरिना म्हणून ओळखली जाते. बिग बाॅस मुळे ती घराघरात लोकप्रिय झाली.रॅप शो ‘हसल २’चा विजेता एमसी स्क्वेअर यांच्या आगामी गाण्याचा पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता पण आता त्याच्या गाण्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गाण्याच्या टीझरमध्ये दोघांची जबरदस्त स्टाइल आणि गाण्याचा मिलाप चाहत्यांना अनुभवता येणार आहे. टीझर येताच सोशल मीडियावर शहनाज आणि एमसी स्क्वेअर सोशल मिडीयावर ट्रेंड करत आहेत.शहनाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणाली की, ‘गनी सयानीचा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज झाला आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता. शहनाझ आणि एमसी स्क्वेअरसह जबरदस्त धमाक्यासाठी सज्ज व्हा.’ दुसरीकडे, एमसी स्क्वेअरनेही या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. गाण्याच्या टिझरला थोड्याच वेळात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
शहनाज गिल ही बिग बाॅसचा विजेता सिद्धार्थ शुक्लाबरोबर असलेल्या रिलेशनमुळे चर्चेत आली होती. पण सिद्धार्थच्या अकाली निधनाने ती कोलमडून गेली होती. पण आता तिने स्वतः सावरले असून आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित केले आहे.सध्या शहनाज तिच्या ‘देसी वाइव्हज विथ शहनाज’ या नवीन टॉक शोमुळे चर्चेत आहे. तर सलमान सोबत एका चित्रपटात दिसणार आहे.