Just another WordPress site

कर्नाटकच्या इशा-यानंतर महाराष्ट्राती मंत्र्यांचा कर्नाटक दाैरा रद्द

मुख्यमंत्री शिंदे अमित शहांची भेट घेणार, सीमावादावर राज्य सरकारची कोंडी

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जर तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटकात सामील करण्याची मागणी केल्यापासुन चर्चेत आला आहे. कर्नाटक सरकार यावर आक्रमक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे उद्या सीमा भागात जाऊन मराठी बांधवांची भेट घेणार होते. पण आता त्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो लांबवणीवर टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचेच सरकार असल्याने केंद्रित नेतृत्वाची कोंडी झाली आहे.

GIF Advt

कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना पाणी सोडण्यात आल्याने आणि आक्रमक वक्तव्य करण्यात आल्याने तणावात भर पडली आहे. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापूर अक्कलकोट देखील कर्नाटक घेऊ असे म्हणत वादात भर घालत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणारे आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे सीमावादावर अमित शहांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आजच्या चर्चेमुळे आणि सीमावाद चिघळू नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून मंत्र्यांना तूर्त दौऱ्यावर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक जरी आक्रमक असले तरी महाराष्ट्र सरकार मात्र सबुरीची भुमिका घेत असल्याचे चित्र आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी देखील महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात न येण्याचा इशारा दिला होता. दोन मंत्र्यांचा दाैरा रद्द झाला असला तरी उदय सामंत मात्र जत तालुक्यातील तिकोंडी, उमदी आणि माडग्याळ गावात भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

अमित शहांशी चर्चा केल्यानंतर शिंदे सीमाभागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील रणनीती आखणार आहेत. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र सरकारला दाैरा रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत. पण कर्नाटकला कोणताही आदेश दिला नाही कर्नाटकात पुढील वर्षी निवडणूक असल्यामुळे भसजपाकडून विचारपूर्वक पावले टाकली जात आहेत. पण मंत्र्यांचा दाैरा रद्द झाल्यामुळे राज्यात विरोधक आक्रमक झाली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!