Latest Marathi News
Ganesh J GIF

अकाउंट ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीसोबत घडली भयंकर घटना

काॅलेजला जाते म्हणून बाहेर पडली पण घरी परतलीच नाही, बघा प्रतीक्षा सोबत काय घडले

अमरावती दि १८(प्रतिनिधी)- कॉलेजला निघालेल्या युवतीचा टिप्परच्या मागच्याचाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अमरावती जिल्ह्यातील हनवत खेडा येथे घडली आहे. प्रतीक्षा राजेंद्र गावंडे असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. तिच्या मृत्युमुळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.

प्रतीक्षा आपल्या दुचाकीने घरून महाविद्यालयात जायला निघाली होती. वाटेतच (एमएच २७ एक्स ६८५६) क्रमांकाच्या टिप्परने तिला चिरडले. त्यात टिप्परच्या मागच्या चाकाखाली आलेल्या प्रतीक्षाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालक तिथून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेहाला शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलं. पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रतीक्षाला एम. कॉम. पूर्ण करायचे होते. ती एक हुशार, अभ्यासू आणि हसमुख विद्यार्थिनी होती. चांगली नोकरी मिळावी, असे स्वप्न तिने पाहिले होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासदेखील सुरू केला होता. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी होण्याची स्वप्न प्रतीक्षा बघत होती. पण, टिप्पर तिच्यासाठी काळ बनून आला आणि प्रतीक्षाचा दुर्देवी अंत झाला आहे. रस्त्यावरील अतिक्रमण प्रतीक्षाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्षाच्या मृत्यूची घटना गावात समजतात गावातील नागरिकांनी टिप्पर जाळण्याचा प्रयत्न केला. परतवाडा पोलिस वेळीच दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. तसेच गावातून अरुंद असलेल्या रस्त्याने जड वाहने चोरूनलपून गौण खनिजाची वाहतूक करतात. त्यामुळे असे अपघात होत असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!