Just another WordPress site

भंडा-यातील या नवरा बायकोसोबत घडला भयानक प्रकार

अपरात्री घडलेल्या त्या घटनेमुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान

भंडारा दि १४(प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपेत असलेल्या पती-पत्नीची गळा चिरत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही गावात घडली आहे. घरात झोपलेले असतानाच दोघांचीही गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
घडलेली घटना अशी की भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही गावात रात्री सुशील बोरकर आणि त्यांच्या पत्नीची गळा चिरुन हत्या करण्यात आली. बोरकर कुटुंबातील सर्व सदस्य झोपले होते. तर शेचारच्या खोलीत त्यांचे दोन मुलं झोपले होते. याचवेळी ही हत्या करण्यात आली आहे. सकाळी अनेकवेळा आवाज देऊनही घरच्या सदस्यांनी शेजा-यांच्या मदतीने दरवाजा दरवाजा उघडल्यनंतर पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले. दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. तात्काळ या घटनेची माहिती गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

GIF Advt

गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यांची हत्या का करण्यात आली त्या मागचा हेतू काय याचा शोध पोलीस घेत आहेत. पण या भयानक हत्याकांडाने भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!