मुंबई दि १४(प्रतिनिधी)-राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी देवेंद्र फडणवीस सुपर सीएम असल्याच्या चर्चा आहे. याचा अनुभव अनेकवेळा आला आहे. त्यातच नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीत नाना पाटेकरांनी मुख्यमंत्र्यांना विविध प्रकारच्या टेंडर्सविषयी प्रश्न विचारला. पण हे उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना मध्येच रोखलं आणि स्वत: उत्तर दिलं. मात्र त्यांची ही कृती काही नेटकऱ्यांना आवडलेली नाही. त्यामुळे वेगवेगळ्या क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.त्यातून फडणवीसांना ट्रोल केले जात आहे.
लोकमतच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी अनेकवेळा शिंदे बोलत असताना त्यांना फडणवीसांनी रोखले आणि स्वतः बोलू लागले. त्यामुळे ‘किमान मुलाखतीमध्ये तरी मुख्यमंत्र्यांना बोलू द्या’ अशा शब्दात फडणवीसांना नेटक-यांनी ट्रोल केले आहे. विशेष म्हणजे या वादात काँग्रेसनेही उडी घेतली आहे. मुख्यमंत्री शो पीस आहेत का असा सवाल विचारला आहे. तर काहींनी फडणवीसांनी एकदा रामदास पाध्येंकडून थोडी बोलक्या बाहुल्यांची कला शिकून घ्यावी, म्हणजे मुख्यमंत्री फक्त ओठ हलवतील, हावभाव करतील, हातवारे करतील आणि आवाज बाजूला बसलेले फडणवीस काढतील असा टोला लगावला आहे. एकंदरीत व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण फडणवीसांना ट्रोल करत आहेत तर काही जण फडणवीसांच्या बाजूने प्रतिक्रिया देत आहेत. पाहूयात

शिंदे मुख्यमंत्री आहेत की शो-पीस? pic.twitter.com/OQem0xaqMo
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 13, 2022