भयंकर! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या
प्रेम विवाहाचा धक्कादायक अंत, पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीचे धक्कादायक कृत्य, चाैकशीत वेगळेच सत्य समोर
भोजपूर दि ११(प्रतिनिधी)- पती पत्नीचे नाते एक सुंदर नाते म्हणून ओळखले जाते. पण जर त्या नात्यात कोणी वेगळा विचार करू लागले, तर नाते संपायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. येथे पत्नीने आपल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केली आहे.
मिथुन गिरी असे मृत तरुणाचे नाव आहे. तर मिथुनची पत्नी नेहा देवी हिला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिथुन गिरी हा हरियाणातील गुरुग्राममध्ये ट्रक चालकाचे काम करायचा. त्याचा चार महिन्यांपूर्वी इटम्हा गावातील रहिवासी नेहा देवी सोबत प्रेमविवाह झाला होता. मिथुनच्या वडिलांनी सांगितले की, मिथुन गुरुग्राम येथून दोन महिन्यांपूर्वी घरी आला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी आपल्या पत्नीला भेटण्यासाठी इटम्हा येथे आपल्या सासरी गेला होता.पण त्यानंतर त्याच्याशी काहीच संपर्क झाला नाही. आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याचा फोन सतत स्विच ऑफ येत होता. त्यानंतर त्याच्या मेहूण्याला फोन केला मात्र त्यानेही फोन उचलला नाही. आम्हाला संशय आल्याने चौकशी केली असता कळले की सुनेने आपल्या प्रियकरासोबत मिळून मिथुनची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह अंगणातच पुरला आणि त्यावर फुलाचे झाड लावले. तर पत्नी नेहा देवी हिने वेगळाच दावा केला आहे. ती म्हणाली घटनेच्या दिवशी तिचा आणि तिच्या पतीचे घरगुती कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर संतापाच्या भरात मिथुनने घराचा दरवाजा बंद करून गळफास लावून घेतला. त्यानंतर घाबरल्याने तिने गावातील बबलू पासवानला बोलावून त्याच्या मदतीने पतीचा मृतदेह अंगणात पुरला. जेणेकरुन कोणाला याची माहिती होऊ नये. पण पोलिसांना संशय आल्याने त्यानी मृतदेह बाहेर पाडून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन डीएसपी राहुल कुमार सिंह यांनी दिले आहेत.
मिथुनच्या वडिलांनी पत्नी नेहा देवी तिचा प्रियकर आणि इतर दोघांच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी सुन नेहा देवी, तिचा प्रेमी बबलू पासवान, तिचा भाऊ दीपक गिरी और सासू बिंदा देवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.