Latest Marathi News
Ganesh J GIF

अंधेरीतील विजयाने बुस्ट मिळालेल्या ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का

शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मुलीचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई दि ७ (प्रतिनिधी) – अंधेरीतील पोटनिवडणूकीत विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आता तर त्यांनी थेट राष्ट्रवादीला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू साथीदार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची कन्या मेघना काकडे-माने यांना शिवसेनेत प्रवेश देत शिवबंधन बांधले आहे. या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेने पडलेली फुट आणि नुकताच अंधेरीत मिळालेला विजय यावरून ठाकरेंनी पक्षबांधणी सुरु केल्याचे दुसरा आहे म्हणूनच उद्धव ठाकरेही पक्षामध्ये वेगवेगळ्या चेहऱ्यांना संधी देत आहेत. आता मात्र ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसलाच धक्का दिला आहे. पवारांचे विश्वासू अंकुश काकडे यांची कन्या मेघना काकडे माने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर मेघना काकडे माने यांनी हातात शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला, यावेळी निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे, अनिल परब, सचिन आहिर, आदेश बांदेकर हे नेते उपस्थित होते. मेघना काकडे माने या मुंबईच्या अंधेरी भागात राहतात. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकित ठाकरे गटाची ताकत वाढणार आहे.

अंकुश काकडे हे पुण्याचे माजी महापौर होते, अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय असून सध्या ते पक्षाचे प्रवक्ते आहेत. ते शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. मात्र मेघना काकडे-माने यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत अंकुश काकडे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!