सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमात महिलेचा अश्लील डान्स
फडणवीसांच्या जिल्ह्यात नेमक चाललय काय, व्हायरल व्हिडिओ बघाच
नागपूर दि ७(प्रतिनिधी)- नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी नगरपंचायतीने लोकांसाठी समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमाच प्रबोधनाऐवजी चक्क अश्लिल डान्स करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पारशिवणी नगरपंचायतीने लोकांसाठी समाजप्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन केले होते सुरुवातीला या कार्यक्रमात पथनाट्य सादर करत सामाजिक संदेश देण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी डान्स आणि संगीताचा कार्यक्रम करण्यात आला. पण कार्यक्रमात नृत्य सादर करणाऱ्या डान्सरने चक्क अश्लील हावभाव करत डान्स सुरु केला. प्रेक्षक देखील तिच्यासोबत अश्लील डान्स करत होते. या कार्यक्रमाचा व्हिडीओ @PravinSindhu या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी प्रचंड भडकले आहेत.

VIDEO: नागपुरात सरकारी समाजप्रबोधन कार्यक्रमात अश्लील नृत्याचा कळस#Nagpur #ViralVideo pic.twitter.com/72zH1173WA
— Pravin Sindhu Bhima Shinde 🇮🇳✊ (@PravinSindhu) November 6, 2022
कार्यक्रमात राजकिय मंडळींसोबत काही सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड टीका करत आहेत. आयोजकावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रबोधनात्म कार्यक्रमात असा डान्स करण्यात आल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.