Latest Marathi News

‘या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ती पोस्ट व्हायरल

कष्टाच... अस का म्हणाली अभिनेत्री,अभिनेत्रीची नेमकी पोस्ट काय? बघा

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.तसेच प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या तिची एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.

प्राजक्ताला नुकताच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ चा ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ हा पुरस्कार मिळाला आहे. प्राजक्ता ‘पांडू’ चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. प्राजक्ता माळीने पुरस्कार मिळाल्यावर सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. “कष्टाचं चीज व्हायला सुरूवात झाली असं म्हणायला हरकत नाही…बक्षिस…भरभरून votes दिल्याबद्दल सबंध महाराष्ट्राचे मनापासून आभार. असंच अविरत प्रेम आणि अखंड पाठिंबा आणि आशीर्वाद असू देत, हीच विनंती. मला खलनायिका म्हणून काम करायला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं, त्यात हा पुरस्कार मिळाला…त्यामुळे विशेष आनंद…माझे सर्व सहकलाकार, तंत्रज्ञ, team पांडू आणि ज्यांनी मला ह्या भूमिकेसाठी निवडल ते म्हणजे विजू माने ह्यांचे विशेष आभार…”, अशी पोस्ट करत तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. पांडू चित्रपटात प्राजक्ताने ‘करुणाताई पठारे’ ही भूमिका साकारली आहे.

प्राजक्ता जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्याचबरोबर ‘चंद्रमुखी’, ‘लकडाऊन लग्न’ पांडू या चित्रपटात अभिनय केला आहे. प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोचं सूत्रसंचालन करत आहे. तिने नुकताच तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरू केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!