Latest Marathi News
Ganesh J GIF

सांस्कृतिक पुण्यात महिला सुरक्षेचे तीनतेरा

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेसोबत हैवानी कृत्य

पुणे दि २०(प्रतिनिधी)- बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पुण्यातील मुंढवा भागात घडली आहे. या घटनेत महिला सुदैवाने बचावली असून आरोपी फरार आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

पोलीसांनी याप्रकरणी रमजान खलील पटेल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रमजान पटेल आणि महिला एकमेकांना ओळखतात. पटेलने संबंधित महिलेला २०१८ साली फिरायला जाऊ असे म्हणत बार्शी येथे नेले होते. त्यावेळी त्याने महिलेवर बलात्कार केला होता. याप्रकरणी महिलेने पटेलच्या विरोधात पांगरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी सोलापूर न्यायालयात खटला चालू आहे. त्यामुळे रमजानने त्या महिलेला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले होते. यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी चिडलेल्या रमजानने बाटलीतून आणलेले पेट्रोल महिलेच्या अंगावर ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला जखमी झाली आहे, तर आरोपी रमजान फरार झाला आहे

पुण्यात मागील काही दिवसांपासुन महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. काैटुंबिक हिंसाचार आणि विनयभंगाच्या घटनेतही वाढ झाली आहे. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे दरम्यान पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे घटनेचा तपास करीत आहेत. पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!