Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीचा आत्महत्येपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

या व्यक्तीवर आरोप, म्हणाली 'मला काही झाल्यास त्याला तोच जबाबदार'

अयोध्या दि २०(प्रतिनिधी) – भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस सखोल करत आहेत. त्यातच अभिनेत्रीचा मृत्युपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती खूपच हमसून रडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आकांक्षाच्या मृत्यू प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.यात तिने एकावर आरोप केले आहेत.


आकांक्षा दुबे हिच्या मृत्यू प्रकरणात आज नवा ट्विस्ट आला आहे. ज्यामध्ये आकांक्षा दुबे रडताना दिसत आहे. यासोबतच तिला काही झाले तर त्याला फक्त समर सिंह जबाबदार असतील असेही ती सांगत आहे. आकांक्षा दुबेचा हा व्हिडीओ कधीचा आहे आणि कधी अपलोड करण्यात आला याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. या व्हिडीओबाबत माहिती नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. असा व्हिडिओ असेल तर त्याची दखल घेऊन तपास केला जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.यामुळे या आकांक्षाच्या मृत्यूप्रकरणात समर सिंहवरील संशय अधिक बळावला जात आहे. आकांक्षा दुबेचा आत्महत्येच्या २४ दिवसांनंतर आकांक्षाचा ३८ सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दुसरीकडे आकांक्षाची आई मधू दुबे यांनी समर सिंहचे समर्थन करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. गुन्हे शाखेने समर सिंहला दिल्लीजवळच्या गाझियाबादमधून काही दिवसांपूर्वी अटक केली होती. दरम्यान आकांक्षा दुबेचे वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी समर सिंगच्या सीबीआय चौकशीचीही मागणी करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.

आकांक्षा दुबे ही आगामी सिनेमाच्या शुटिंगकरिता वाराणसीला गेली होती. शुटिंगच्या दरम्यान ती सारनाथ येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. आकांक्षाने तिथे गळफास घेत आत्महत्या केली होती. आकाक्षांचे इन्स्टाग्रामवर तब्बल १.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की २’ सारख्या गाजलेल्या सिनेमामध्ये काम केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!