या अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्वीकारत गुपचूप केले लग्न
सोशल मिडीयावर नवविवाहित जोडीचे फोटो व्हायरल, अनेकांनी केले काैतुक तर काहींची टिका
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री गेहना वशिष्ठ होय. ‘गंदी बात’मुळे रातोरात प्रकाशझोतात आलेल्या गेहनाने गुपचूप पद्धतीने लग्न केलं असून तिच्या निकाहचे फोटो आता समोर आले आहेत. विशेष म्हणजे गेहनाने इस्लाम धर्म देखील स्वीकारला आहे.
गेहनाने अभिनेता-बॉयफ्रेंड फैजान अन्सारीसोबत लग्न केले असून तिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. नवविवाहित जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेहाना वशिष्ठ आणि फैजान गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांनी त्यावर कधीच भाष्य केले नव्हते. पण आता लग्न करत त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत रूप दिले आहे. गेहानाने तिच्या लग्नात लाल रंगाचा पोशाख घातला होता तर तिचा नवरा फैजानने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. अभिनेत्री गेहानाचा पती फैजान अन्सारीहा सांगायचे तर ते सोशल मीडिया स्टार आणि अभिनेता आहे. तो अॅमेझॉन मिनी टीव्हीच्या रिअॅलिटी शो ‘डेटबाजी’मध्ये दिसला होता. तर गेहना वशिष्ठ ही एक अभिनेत्री-मॉडेल असून तिने हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये अनेक डान्स आयटम केले आहेत. गेहाना वशिष्ठला राज कुंद्राच्या केसमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर तिला या प्रकरणात जामीन मिळाला. पॉर्न व्हिडीओ तयार करणे आणि वेबसाईटवर ते अपलोड करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेहनानं मिस एशिया बिकिनीचा पुरस्कारही जिंकला आहे.
गेहनाचे निकाहचे फोटो शेअर करत त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सध्या या जोडीवर काहींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर, काही जणांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अर्थात दोघांनीही अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर येऊ लागले आहेत.