Latest Marathi News
Ganesh J GIF

एसटी आणि कंटेनरच्या भीषण अपघात पाच ठार

बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील घटना, १३ जण जखमी, अपघाताची मालिका

बुलढाणा दि २३(प्रतिनिधी)- मुंबई – नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३ जण जखमी झाले आहेत. भरधाव ट्रक आणि एसटीच्या धडकेनं हा भयंकर अपघात घडला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मुंबई-संभाजीनगर-नागपूर च्या जुन्या महामार्गाजवळ हा अपघात झाला. ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी ६.१५ च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला आहे. अपघाताच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. तसंच मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.या भीषण अपघातात पाचजण ठार झाले आहेत. सिंदखेडराजा जवळ पळसखेड चमकत या गावाजवळ हा भीषण अपघात झाला. ही बस संभाजी नगरहून वाशिमकडे जात होती. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मृत्यूमुखी पडलेल्यांची अजून ओळख पटलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान कालच बुलढाणा जिल्ह्यात देवदर्शन करुन परत येताना शेगाव शहरातील प्रवेश कमानीच्या सिमेंटच्या खांबाला भरधाव क्रूजर गाडी धडकून झालेल्या अपघातात चालक व तीन महिला ठार झाल्या होत्या.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!