मुंबई दि १३(प्रतिनिधी)- प्रेमात प्रेमवीर आपल्या प्रेमिकेला चंद्र तारे तोडून आणण्याचा दावा करतात पण प्रत्यक्षात ते शक्य नाही. पण आपल्या रोजच चालणाऱ्या टीव्ही सिरियलमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. कारण एका सिरियलमध्ये हिरोने चक्क आपल्या हिराॅईन साठी चक्क चंद्रच तोडून आणला. हा सीन सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला मजेशीर सीन ‘ये जादू है जिन्न का’ मालिकेमधील आहे. मालिकेत हिरोईन हिरोला माझ्यासाठी चंद्र तोडून आणं असे सांगते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिरोही लगेच गाडीमध्ये बसून आकाशात जातो आणि दोरीनं चंद्राला बांधून खरोखर चंद्र तोडून आणतो.हिरो हा कारनामा करत असताना त्याचे कुटुंब त्याला प्रोत्साहन देत असतं. आजच्या मालिका केवळ ड्रामा म्हणूनच राहिल्या आहेत. अगोदरच्या मालिकेत आशय असायचा पण आजच्या सिरियल पाहुन फक्त त्यांची किव करावीशी वाटते.

मालिका काल्पनिक असतात पण त्यामध्ये काहीतरी अर्थ असायला हवा. पण चंद्र तोडायचे म्हणजे अतिच झाले असा सुर प्रेक्षकांनी लावला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.