Latest Marathi News
Ganesh J GIF

पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

पोलिसात तपासात धक्कादायक खुलासा, विवाहित जोडप्यांचा असा शेवट

पालघर दि २५(प्रतिनिधी)- महिलेने पतीच्या प्रेयसीच्या पतीच्या मदतीने स्वत:च्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बांधनपाडा इथे ही घटना घडली आहे. पोलीसांनी या प्रकरणी महिलेसह पाच जणांना अटक केली आहे.

संतोष रामा टोकरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर संजीवनी टोकरे असे असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष टोकरेचे एका विवाहित महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. ही महिला त्याच्या नात्यातलीच होती. त्याने महिलेला पळवून आणलं होते. त्यामुळे त्या महिलेच्या पतीच्या मनात संतोषबद्दल राग होता. ही गोष्ट संतोषची पत्नी संजीवनीला माहित होती. यातूनच तिने पतीचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी तिने त्या महिलेच्या पतीची मदत घेण्याचे ठरवले. दोघांनी मिळून कटाची आखणी केली. घटनेच्या दिवशी संतोष टोकरे रात्री झोपेत असतानाच त्याची गळा दाबून आणि डोक्यात धारधार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. पोलीस या हत्येचा तपास करत असताना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संजीवनीची अधिक चाैकशी केली असता या हत्येचा उलगडा झाला महत्वाचे म्हणजे संजीवनीचे त्या महिलेच्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात पोलीसांनी संजीवनी टोकरे,नितिन सवरा,स्वप्निल मढवी,सतिश मारगे, रोहित जाधव यांना अटक केली असुन आरोपींविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सगळ्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!