महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीला मिळाला स्वप्नातील राजकुमार?
सोशल मिडीयावरील ती पोस्ट चर्चेत, चाहत्यांना उत्सुकता, अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची क्रश असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या दिलखेचक आणि गोड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. सोशल मिडीयावर तिची मोठी फॅन फाॅलोअर्स आहेत.तिचे मनमोहक हास्य अनेकांना घायाळ करणारे असते. आपल्या इन्टाग्राम पेजवरून ती आपले हटके फोटोशूट कायमच शेअर करताना दिसते. चाहते देखील त्याला कायम हटके प्रतिसाद देत असतात. अशी मोहक प्राजक्ता पुन्हा एकदा विशेष चर्चेत आली आहे.
प्राजक्ताने पुन्हा एकदा फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले आहेत. पण यावेळी फोटोपेक्षा ती त्या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. यावरुन तिला तिचा राजकुमार मिळाला आहे का असा प्रश्न तिच्या चाहतावर्गला पडला आहे.
प्राजक्ताने कॅप्शन लिहिले आहे की, ‘ह्रदयी प्रीत जागते.. जाणता अजाणता.’ प्राजक्ताच्या या कॅप्शनने अनेकांना ती प्रेमात आहे का असा प्रश्न पडला आहे. तिने यावेळी शेअर केलेल्या फोटोत ती एकदम खास दिसत आहे. निळ्या साडीत अन् कानातले, गळ्यातले, अंगठ्या, नथ, बांगड्या, टिकली अशा सुंदर आभूषणांनी तिचे रूप सजले आहे. या फोटोला अनेक लाईक्स भेटत आहेत. पण तिने हे फोटोशुट तिचा दागिन्यांचा ब्रँड प्राजक्तराजसाठी केले आहे. प्राजक्ताने तिच्या दागिन्यांचं कलेक्शन समोर आणले आहे. या दागिन्यांमध्ये बेलपानटिक, जोंधळेमणीगुंड, कोयरीतोडे, कुडी, बाजूबंद, गुलाबकाटा, बुगडी असे दागिने आहेत.
प्राजक्ता माळी अभिनेत्री, निवेदिका आहेच शिवाय ती आता यशस्वी बिझनेस वूमन आहे. प्राजक्ताने आजवर अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केले आहे. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्राचं सुत्रसंचालन करत आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतुन मालिकाविश्वात पदार्पण केले होते.