सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटीच्या यादीत ही अभिनेत्री पहिल्या स्थानावर
आयएमडीबीची लोकप्रिय सेलिब्रेटी रँकची घोषणा, किंग खानसह अनेकांना मागे टाकत मिळवले पहिले स्थान
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- भारतात अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांना मिळणारे स्टारडम खुपच जास्त आहे. पण सध्या एका अभिनेत्रीने याला छेद देत लोकप्रियतेत पहिला क्रमांक मिळवला आहे. साऊथ आणि बाॅलीवूडची ही अभिनेत्री लोकप्रिय ठरली आहे.
आयएमडीबीच्या लोकप्रिय सेलिब्रेटीच्या यादीत तमन्ना भाटिया लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे. विशेष म्हणजे किंग खान म्हणवल्या जाणाऱ्या शाहरुख खानला देखील तिने मागे टाकले आहे. शाहरुख या यादीत दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. यानंतर या यादीत मृणाल ठाकूर, कियारा अडवाणी, राम चरण, रणवीर सिंग आणि थलपथी विजय यांना स्थान देण्यात आले आहे. बाहुबलीनंतर तमन्नाला देशभरात ओळख मिळाली होती. तमन्नाने ‘जी करदा’ आणि ‘लस्ट स्टोरीज २’ च्या यशाने उंच भरारी घेतली असून तिच्या तामिळ चित्रपट ‘जेलर’ मधील कावला हे गाणं नुकतंच प्रदर्शित झाले आहे आणि या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.या गाण्यात तिच्यासोबत रजनीकांत देखील आहे. अभिनेत्री म्हणून तमन्ना अष्टपैलू म्हणून ओळखली जाते. विविध भुमिका तिने सहज साकारल्या आहेत. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे असेल तर ती मल्याळममध्ये ‘बांद्रा’, ‘जेलर’ आणि ‘अरनमनाई 4’ तमिळमध्ये आणि ‘भोला शंकर चित्रपटात दिसणार आहे. ‘जेलर’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा नुकतेच लस्ट स्टोरीज २ मध्ये दिसले होते. कारण रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही आवडली आहे. दोघे सध्या रिलेशनचा आनंद घेत असुन लवकरच लग्न करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.