Latest Marathi News
Ganesh J GIF

पतीसमोर महिलेवर बलात्कार करणाऱ्याला पोलीसांनी घडवली अद्दल

हडपसर पोलीसांनी आवळल्या बलात्कारी सावकाराच्या मुसक्या, भर पावसात घडवली अद्दल, व्हिडीओ व्हायरल

पुणे दि २९(प्रतिनिधी)- पुणे शहरात दररोजच गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडत आहेत. त्यातच हडपसरमध्ये सावकाराने कर्जदाराच्या पत्नीवर पतीसमोरच बलात्कार केला होता. तसेच या भयानक प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पुण्यातील हडपसर परिसरात या वर्षीच फेब्रुवारी मध्ये ही घटना घडली होती. आता पोलीसांनी त्या आरोपीला अटक करुन चांगलीच अद्दल घडवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेचा पती बॅगा विकण्याचे काम करतो. त्याने आरोपी शेख करून ४० हजार रुपये उसने घेतले होते. ते त्याने परत न केल्यामुळे इम्तियाज शेखने फिर्यादी आणि तिच्या पतीला सुरक्षानगर येथे बोलावून घेतले. आणि पतीसमोरच महिलेवर बलात्कार केला. पण आरोपीकडून वारंवार शरीरसुखाची मागणी होऊ लागल्याने तिने त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर त्या महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार केली होती. त्यानंतर हडपसर पोलीसांनी आरोपीला अटक करून हडपसरमधील सुरक्षानगर या भागातून भर पावसात धिंड काढली आहे. या कारवाईनंतर हडपसर पोलीसांचे काैतुक होत आहे.

पाठिमागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्हा गुन्हेगारीच्या बाबतीत जोरदार चर्चेत आहे. कधी कोयता गँगची दहशत. कधी महिलांवरील हल्ले, कधी पार्किंगमधील वाहनांची स्थानिग गावगुंडांकडून होणारी तोडफोड, अशा एक ना अनेक कारणांनी पुणे चर्चेत आहे. त्यामुळे अनेकवेळा चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!