Just another WordPress site

भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या मामीने केले असे काही

पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली, भाच्याने सगळी घटनाच सांगितली

कुशीनगर दि २६(प्रतिनिधी)- मामीच्या प्रेमात दिवाना झालेल्या भाच्याने मामाची गोळी मारुन हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये घडली आहे. हत्येमध्ये भाच्याच्या मित्रही सहभागी होता. कहर म्हणजे मामीलाही भाचा आवडायचा. धक्कादायक बाब म्हणजे या हत्याकांडात भाच्यासोबत मामीचाही सहभाग होता. पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

GIF Advt

पोलीसांनी भाचा विद्यारंजन त्याचा मित्र आणि त्याची मामी यांना अटक केली आहे. विद्यासागर असं मामाचं नाव होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भाच्याने १३ नोव्हेंबरला मित्रासोबत मामाची हत्या केली. पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी तपासानंतर आज पत्रकार परिषद घेऊन या हत्याकांडचा खुलासा केला. मामीच्या प्रेमात वेड्या झालेल्या भाच्याने मित्राच्या मदतीने मामाचा गेम केला, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. पोलिसांनी गुन्हेगारांवर २५ हजार रुपयांचं बक्षिसही जाहीर केलं होतं. दरम्यान पोलिसांनी मामी भाच्यासह त्याच्या मित्रालाही अटक केली आहे.पोलिसांना मृताच्या पत्नीवर संशय आला. तिला ताब्यात घेतलं. कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. मामी भाच्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने स्वतः च्या पतीचा खून केला या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

“माझं रवीवर प्रेम होतं. आम्हा दोघांना लग्न करायचं होतं. मात्र माझा नवरा विद्यासागरचं लग्नास विरोध होता. त्यानंतर मी रवीसोबत विद्यासागरला कायमचा संपवण्याचा कट रचला”, अशी माहिती विद्यासागरच्या पत्नीने पोलिसांना दिली. विवाहबाह्य संबंधांच्या अनेक घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!