
ही अभिनेत्री खासदारासोबत या दिवशी घेणार सात फेरे
बहुप्रतिक्षित जोडीच्या लग्नाची तारीख जाहीर, राजस्थानमध्ये करणार लग्न, दिग्गजांची असणार उपस्थिती
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- बाॅलीवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंट झाल्यापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. यांच्या लग्नाला अनेकांची उपस्थिती असणार आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा २५ सप्टेंबररोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांचा साखरपुडा १३ मे २०२३ रोजी दिल्लीत झाला होता. पण लग्नाच्या तारखेबद्दल कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. हे लग्न राजस्थानमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर गुरुग्राममध्ये रिसेप्शन होणार आहे. बहीण प्रियांका चोप्राप्रमाणेच परिणीतीही शाही पद्धतीने लग्न करणार असल्याची चर्चा आहे. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, खास मित्र आणि बॉलिवूड इंडस्ट्रीपासून राजकारणापर्यंतचे लोक लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परिणीती आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. हे एक भव्य लग्न असेल. परिणीती आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत मौन बाळगले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती तिच्या लग्नाची तयारी सुरू करणार आहे. परिणीती आणि राघव हे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. या जोडप्याने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. सध्या दोघेही राजस्थानमधील लग्नासाठी योग्य आणि खास असे ठिकाण शोधत आहेत. दरम्यान परिणीती सध्या ‘द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये ती अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी जेव्हापासून त्यांचे नाते अधिकृत केले तेव्हापासून ते खूप चर्चेत आले आहेत. या जोडप्याने बरेच दिवस आपले नाते गुपित ठेवले होते. राघव चढ्ढा आपचे राज्यसभेचे खासदार आहेत.