मोठी बातमी! अजित पवार राष्ट्रवादीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
अजित पवार यांचा शरद पवारांना मोठा धक्का, निवडणूक आयोगात याचिका दाखल, पवारांना धक्का
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत भाजपासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे राज्यात शिवसेनेसारखी परिस्थिती राष्ट्रवादीत तयार झाली आहे. दोन्ही बाजूंनी आम्हीच खरी राष्ट्रवादी असे सांगत आहेत. ही लढाई निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचली आहे. पण आता अजित पवारांनी मोठी खेळी खेळत शरद पवार यांना धोबीपछाड केले आहे.
अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव अजित पवार गटाकडून मंजूर करण्यात आला आहे. तसे पत्रही निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आले आहे. शरद पवारांना हटवत अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केल्याच्या ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केला आहे. यावर ४२ आमदारांच्या सह्या आहेत. विशेष म्हणजे ३० जून रोजीचे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यांचे पत्र आज दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिवसेनेनंतर पक्ष फुटीचा दुसरा अंक राष्ट्रवादीत सुरु झाला आहे. दरम्यान अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे, हे प्रकरण आता निवडणूक आयोगात गेलं आहे. त्यानुसार अजित पवारांकडे पक्षाचे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहिती द्यावी लागणार आहे.
“आपल्याला विश्वासात न् घेता व कोणतीही पूर्व कल्पना न् देता, आमदारांच्या सह्या या पत्रावर घेतल्या गेल्या आहेत” असा दावा काही आमदारांनी केला आहे. पण एकंदरीत पुढील काळात शिवसेने प्रमाणेच राष्ट्रवादीची अवस्था होईल, असे चित्र दिसत आहे.